Uncategorized
कवडा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

जिंतूर-( गुणीरत्न वाकोडे)–तालुक्यातील कवडा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त गावाच्या मुख्य मार्गावरून प्रतिमेचे ढोलताशांच्या गजरात शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली.सदरील मिरवणुकीत आंबेडकरी अनुयाया सह सर्व जातीधर्माचे नागरिकांनी मिरवणुकीत गुण्यागोविंदाने सहभाग नोंदविला.
मिरवणुकी पूर्वी डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे औक्षण करण्यात आले. या वेळी माजी पस सदस्य गजानन चव्हाण, सौ.गीताबाई चव्हाण, प्रा.वनिता अशोक प्रधान, प्रा.ज्योती संतोष प्रधान व ग्रामस्थ मोठ्या प्रमानावर उपस्थित होते.