
जिंतूर (गुणीरत्न वाकोडे)–मराठा सेवा संघाच्या वतीने जिंतूर मध्ये जिजाऊ रथयात्रा मराठा जोडो अभियान राबवण्यात येत असून हा जिंतूर येथे जिजाऊ मातेच्या पूर्ण आकृती पुतळा घेऊन आलेला रथयात्रेत अण्णाभाऊ साठे चौक जिंतूर येथे मराठा संघाच्या वतीने तसेच जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने जल्लोष मध्ये स्वागत करण्यात आले. या यात्रेमध्ये शहाजी महाराज जयंती निमित्त निघालेल्या जिजाऊ रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शहरी भागात या रथयात्रेचे स्वागत होत आहे.
ही रथयात्रेचा प्रारंभ शहाजी महाराज जयंती निमित्त 18 मार्च रोजी भोसले गडी वेरूळ जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथून सर्व महाराष्ट्र शहरी भागात जाऊन महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मे रोजी लाल महाल पुणे येथे संपन्न होणार आहे या रथयात्रेचे 45 दिवस फिरणार आहे या रथ यात्रेमधील महत्त्वाचे विषय म्हणजे कायदा आणि हक्क व संविधान याबद्दल जनजागृती तसेच सामाजिक एकता व एकात्मता नागरिक म्हणून आपले जबाबदारी व कर्तव्य समजावून सांगणे समाजात सखोल आणि एक ते राखण्याचे महत्व जातीय ते निर्माण होऊ नये म्हणून प्रबोधन करणे, युवकांच्या बेरोजगारी, व्यसनाधीन दिशाभूल करणाऱ्या प्रवृत्तीना थांबवण्यासाठी मार्गदर्शन करणे, असे अनेक मुद्दे घेऊन माता जिजाऊ रथयात्रा घेऊन जिंतूर मध्ये दाखल झाली आणि दुपारी या त्याचे स्वागत करून हा रथ येलदरी सेनगाव मार्गे हिंगोली मार्गस्थ झाला.