Uncategorized

एसटी आगारात 14 एप्रिल होणार उत्सवात साजरी:डॉ यशवंत खडसे होणार सत्कार

ढोलताष्याच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत निघणार मिरवणूक

एसटी आगारात 14 एप्रिल होणार उत्साहात साजरी

ढोलताशांच्या व फटाक्यांच्या आतिषबाजीत निघणार मिरवणूक

संविधान प्रतीचे होणार वाटप

जिंतूर— दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एसटी आगारामध्ये विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेत 14 एप्रिल मोठ्या हर्षवल्यासात साजरी करण्यात येणार आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डेपोवर विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून 14 एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन होणार असून अभिवादन केले जाणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.यशवंत खडसे तर अध्यक्ष म्हणून आगार व्यवस्थापक आंनद चव्हाण सह प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे व स्थानक प्रमुख रामेश्वर सोनवणे,वाहतूक निरीक्षक शरद पाटील,लेखाकार ज्ञानेश्वर पांचाळ,प्रल्हाद मुंढे,वाहन परीक्षक संजीव भांबळे,अशोक देवकर,प्रमुख कारागीर लिंबाळकर,सुनील पंडित,श्याम ढहाळे सह सर्व आस्थापना कर्मचारी सह सर्व चालक,वाहक कारागीर वर्ग उपस्थित राहणार आहे.
अभिवादन सत्कार कार्यक्रम संपन्न झाल्या नंतर सदरील कार्यक्रमात देशाची राज्यघटना (सुविधांनाच्या प्रति) उपस्थित मान्यवरास भेट म्हणून देण्यात येणार आहेत.सदरील कार्यक्रमा नंतर मुख्य मार्गावरून प्रतिमेची ढोलताश्याच्या गजरात शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक निघणार आहे.मिरवणुकी नंतर लगेच मिष्टान्न जेवणाचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे.तरी सदरील कार्यक्रमास सहभागी होण्याचे आवाहन एसटी आगार जयंती अध्यक्ष गुणीरत्न वाकोडे सचिव सुनील खिल्लारे सह कार्याध्यक्ष कमलाकर कनकुटे व तथागत कांबळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button