Uncategorized
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 जयंतीनिमित्त चिंचोली दराडे येथे अभिवादन

जिंतूर-(गुणीरत्न वाकोडे)–तालुक्यातील चिंचोली दराडे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी एकत्र येत जयंती उत्स्फूर्तपणे साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना माधव दराडे सह बाळू दांडगे, तुकाराम दांडगे, प्रल्हाद दांडगे,दौलत उगले,विष्णु मोरे,किशन दांडगे, भास्कर खिल्लारे, दत्ता दांडगे,मोकिंदा दांडगे, रामचंद्र दांडगे,किशन उगले, कृष्णा दांडगे आदी उपस्थित होते.