सम्राट अशोक बुद्ध विहारात धम्म संस्कार शिबिर संपन्न
भंते महाविरा थेरो व भंते संघरत्न यांच्या नेत्रत्वात धम्ममय वातावरणात धम्म संस्कार शिबिर संपन्न!!!

जिंतूर-( गुणीरत्न वाकोडे)–जिंतूर येथे सम्राट अशोक बुद्ध विहार एक दिवशीय धम्म संस्कार शिबिर घेण्यात आले.
शिबिराचे मुख्य मार्गदर्शक व मुख्य धम्मदेशना भंते महावीरो थेरो काळेगाव जिल्हा अहमदपूर भंते संघरत्न आम्रवण महाविहार देवगाव फाटा यांच्या नेतृत्वात अतिशय धम्ममय वातावरणात खूप चांगल्या प्रकारे पार पडले.
जिंतूर तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणात येऊन शिबिराचा लाभ घेतला.
व आपले पुण्य संपादन केले. या शिबिराचे आयोजन जिंतूर तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी मिळून केले होते. यामध्ये मुख्याध्यापक संभाजी खिल्लारे, नामदेव प्रधा,लांडगे सर ,आनंद वाकळे, सावंत सर, दांडगे सर ,बंड साहेब ,वानखेडे साहेब,आशाताई खिल्लारे, प्रतिभा हरभरे,विमल वाहळे,लक्ष्मीबाई कांबळे,सुकेशनी प्रधान ,सुमन लाटे ,सुनिता पाटील ,विमल प्रधान,संगीता ठोके, शेवंता प्रधान,उबाळे ताई, कौशल्या वाकळे,पुष्पा माहुरे, प्रीती लांडगे, शोभा वाघमारे, महिंद्र बनसोडे, मंगल भवाळे अश्वजीत खिल्लारे , भारशंखर सर, अंभोरे सर, मस्के सर,सुर्यवंशी काका, पंडीत सर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.