Uncategorized
श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर विद्यालयात विद्यार्थिनींना दिले पुरणपोळीचे प्रात्यक्षिक
विद्यार्थिनी सह शिक्षकेनीही घेतला सहभाग!!!

जिंतूर—गुणीरत्न वाकोडे)–
श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर प्राथमिक विद्यालय जिंतूर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थिनी कडून पुरणपोळी बनवण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
यावेळी वर्ग सातवीच्या विद्यार्थिनींनी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला, त्यासाठी लागणारे सर्व साहित्य विद्यार्थिनींनी स्वतः जमा केले.
शाळेतील सर्व शिक्षक आणि काही विद्यार्थी यांना पुरणपोळीचा आस्वाद घेता आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व इतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांनी चे अभिनंदन केले.