शिक्षक पंढरीनाथ बुधवंत यांची कारकीर्द प्रेरणादायी–विठ्ठल भुसारे
सलग 38 वर्ष सेवा बजावून सेवानिवृत्त

जिंतूर ( गुणीरत्न वाकोडे) दि.२८ फेब्रुवारी २०२५ – ‘शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असतो आणि पंढरीनाथ बुधवंत यांनी आपल्या कार्यातून हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांची शिक्षकपदाची कारकीर्द ही प्रेरणादायी असून, भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल,” असे गौरवोद्गार शिक्षणाधिकारी माननीय विठ्ठल भुसारे यांनी काढले.
जि.प. माध्यमिक शाळा भोगाव (देवी) येथे श्री.पंढरीनाथ मुगाजी बुधवंत यांच्या सेवानिवृत्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री विठ्ठल भुसारे (शिक्षणाधिकारी, वाशिम), श्री कृष्णकांत देशमुख (संचालक, कृ.उ.बा. समिती, जिंतूर), श्री. के. सी. घुगे (केंद्रप्रमुख), श्री. बाळू बुधवंत, श्री. मनोज तोडकर (केंद्रप्रमुख), श्री. फरकांडे रावसाहेब (शा. व्य. स. अध्यक्ष), श्री. कलगुंडे (मुख्याध्यापक), श्री. राठोड, श्री. काळबांडे , सौ. जाधव, श्री. सरनाईक (क्लार्क) तसेच शाळेचा संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
या वेळी पुढे बोलताना विठ्ठल भुसारे यांनी जि.प. शाळांचे महत्त्व अधोरेखित केले. ” ग्रामीण भागातील शिक्षणसंस्था टिकल्या पाहिजेत, कारण त्या समाजाच्या उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत,” असे त्यांनी सांगितले. बुधवंत पंढरीनाथ यांनी आपल्या अध्यापन कार्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली आणि शाळेच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंढरीनाथ बुधवंत यांनी आपल्या भावना व्यक्त करत, “शिक्षक म्हणून विद्यार्थी घडवताना मिळालेला आनंद आणि समाधान अतुलनीय आहे,” असे सांगितले. भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक पर्यटनाचा अनुभव घेण्याचा संकल्प त्यांनी घेतला.
कार्यक्रमाची सांगता विद्यार्थी, शिक्षक आणि मित्र परिवाराच्या सहभोजनाने झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या गुरुजींना निरोप देताना भावुक होत त्यांच्यासोबतच्या आठवणी जागवल्या.