सेवा शक्ती संघर्ष एसटी कामगार संघाच्या तालुका अध्यक्ष पदी सुरेश कदम यांची बिनविरोध निवड
जिंतूर आगारात कामगार संघटनेचा सुफडासाफ!!!

जिंतूर—येथील एसटी आगार परभणी विभाग येथील प्रादेशिक सचिव अशोकराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कामगारांनी सेवा शक्ती संघर्ष संघात जाहीर प्रवेश केला.
आ. गोपीचंद पडळकर आ. सदाभाऊ खोत आणि सतीश दादा मेटकरी यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवून बहुसंख्य कामगारांनी सेवाषक्ती संघर्ष मध्ये प्रवेश केला.
माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या निवासस्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठकीचे अध्यक्ष पद माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांनी भूषविले.
सदर बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून गोविंद थिटे पाटील (भाजपा तालुका अध्यक्ष) प्रमुख पाहुणे अशोकराव गावडे प्रादेशिक सचिव मराठवाडा प्रदेश तसेच केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय कुमार शेळके विभागीय सचिव गुट्टे उपस्थित होते.
या बैठकीस जिंतूर आगारातील सर्वच हुद्यातील रा प कर्मचाऱ्याची मोठ्या प्रमाणात उपश्टिती होती.
या बैठकीत कामगार संघटना चे 90 टक्के सभासदांनी सेवा शक्ती संघर्ष संघटना मध्ये जाहीर प्रवेश करून पावती घेऊन सभासदत्व स्वीकारले.
तद्नंतर जिंतूर आगाराची सन 2025 करिता कार्यकारिणी ची निवड करण्यात आली सदर कार्यकारणी चे व सभासदांचे मां आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब यांनी स्वतः उपस्थित राहून स्वागत व अभिनंदन करून मी सदैव तुमचा पाठीशी असल्याचे सांगितले सदर बैठकीस भाजपा तालुकध्यक्ष श्री गोविंद थिटे यांनी मोलाचे मार्गदर्शन करूनशुभेचा दिल्या
श्री अशोक गावडे प्रादेशिक सचिव यांनी कामगार हीतवर व कामगारांचा न्याय प्रश्नावर मोलाचे मार्गदर्शन करून सन 2025ची कार्यकारिणी आगार प्रमुख जिंतूर यांना सादर करण्यात आली.
या बैठकीस संघटनेचे बीड विभागाचे तरुण तडफदार नेते श्री अथर सिद्दिकी (माजलगाव आगार) श्री अशोक पांढरे बीड विभागीय सल्लागार युवा कार्यकर्ते अमोल निर्मळ (माजलगाव आगार) हे उपस्थित होते.
तसेच या बैठकीचे आयोजन व नियोजन हे आगार अध्यक्ष सुरेश कदम आगार सचिव दीपक चीलगर कोषाध्यक्ष विष्णू कांत साळवे कार्याध्यक्ष मधुकर घुगे व त्यांचा सर्व सहकाऱ्यांनी जिंतूर आगारातील जास्तीतजास्त सदस्य जोडण्यासाठी संघटनेच्या सद्स्याच्या अधिकृत पावत्या देण्यासाठी अथक परिश्रम घेतले.