राज्यस्तरीय कै. वैद्य शंकर दाजी पदे शास्त्री क्रिकेट चषक स्पर्धेत पीडीए स्पार्टन संघ विजयी
चषक व रोख 51000 रु जिंकले!!!

राज्यस्तरीय कै . वैद्य शंकर दाजी पदे शास्त्री क्रिकेट चषक स्पर्धेत पी डी ए स्पार्टन संघ विजयी
जिंतूर :-. कोकमत्ठाण येथील आत्मा मलिक क्रिकेट ग्राऊंड स्टेडियमवर नुकत्याच काल पार पडलेल्या कै . वैद्य शंकर दाजी पदे शास्त्री क्रिकेट चषक स्पर्धा २०२५ मध्ये पी डी ए स्पार्टन क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात अहिल्यानगर संघाचा पराभव करुन प्रथम क्रमांक पटकाविला त्यांना रोख एक्कावन हज़ार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले .
दि २८/२/ २०२५ ते २/३/२०२५ या दरम्यान झालेल्या स्पर्धेत एकुण १२ संघ सहभागी झाले होते त्यापैकी परभणी डॉक्टर्स असोसिएशनच्या पी डी ए स्पार्टन क्रिकेट संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करुन प्रथम क्रमांक पटकाविला व दुसऱ्या स्थानी अहिल्यानगर ११ संघ तर तीसरा गेम चेंजर नाशिक आणि समर्थ ११ पिंपरी चिंचवड़ या संघाने चवथा क्रमांकाचे पारितोषिक पटकावले .
समारोपीय कार्यक्रमात मंचावर उपस्थित
अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाचे केंद्रीय संगठन समितीचे अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य वैद्य रामदास आव्हाड सर*, केंद्रीय मंत्री आदरणीय गुरुवर्य वैद्य अनिल दुबे, सर महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन अध्यक्ष गुरुवर्य वैद्य सतीश भट्टड या मान्यवरांच्या शुभहस्ते विजेत्या संघाना रोख रक्कम व चषक प्रदान करण्यात आला .
प्रथम राज्यस्तरीय डॉक्टर्स क्रिकेट लीग स्पर्धेत विजयी ठरलेला पी डी ए स्पार्टन क्रिकेट संघाचा कर्णधार डॉ .शिवप्रसाद सानप,उपकर्णधार डॉ. विजय गजभारे आणि टीममधील डॉ किशोर घुगे, डॉ.प्रविण शिंदे,डॉ सचिन जायभाये,डॉ . गजानन गरूड,डॅा . गोविंद वडपुडकर,डॅा. गजानान जाधव,डॅा. भारत शेळके,डॅां. तुषार काबंळे* डॅा.रविराज खंदारे,डॅा . श्रीनिवास घुगे, व डॉ.गंगाधर ढाकरे
इ सर्व खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले .
या अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून डॉ. तुषार कांबळे* यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्य मनोज कोचेटा व वैद्य शिवप्रसाद सानप यांनी आभार मानले.
या विजयाबद्दल निमा डॉक्टर्स असोसिएशन परभणी व डॉक्टर्स असोसिएशन जिंतुर व सर्व पत्रकार बधुंनी तसेच श्री कैलासराव घुगे, श्री नामदेव राठोड , श्री शेषराव जाधव , राम राठौर , श्याम राठौर यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे .