Uncategorized

जिंतूर शहर कडकडीत बंद!!! संतोष देशमुख हत्यारांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फासावर लटकवा

सह आरोपींची पूरवणी आरोप पत्रात नावे घ्या--सकल मराठा

जिंतूर—मस्साजोगचे सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी शिवाय सह आरोपीची पुरवणी आरोप पत्रामध्ये नावे समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी सकल मानवतावादी नागरिकांकडून दिनांक 8 मार्च रोजी जिंतूर कडकडीत बंद ठेऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या हत्येचे समाज माध्यमांमध्ये फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यसह जिंतूर तालुक्यामध्ये आरोपी विरोधात संतापाची लाट उसळली आहे.

म्हणून या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी हत्येप्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी हत्येच्या दिवशी आरोपींना सहकार्य करणारे सर्व पोलीस काही दोषी राजकीय नेते त्यांनाही सहआरोपी करत पुरवणी आरोपत्रात त्यांची नावे घेत इतर आरोपींना तात्काळ अटक करून कार्यवाही करावी अशीही मागणी करण्यात आली आहे दरम्यान या मागण्यांच्या समर्थनार्थ आणि स्व संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी जिंतूर तालुक्यातील सकल मानवतावादी नागरिकांनी एकत्र येत शहर कडकडीत बंद केले यावेळी व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून आपापली प्रतिष्ठाने बंद ठेऊन सहकार्य केले आहे यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button