
विजय चोरडिया यांना जैन समाजभूषण पुरस्कार प्रदान
जिंतूर:- सकल जैन समाजसेवा संघ नांदेडच्या वतीने देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार विजय चोरडिया यांना मान्यवरांच्या हस्ते नांदेड येथे प्रदान करण्यात आला कार्यक्रमासाठी जैन अल्पसंख्यांक महामंडळाचे अध्यक्ष नामदार ललित गांधी यांची उपस्थिती होती
जैन समाजातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. सकल जैन समाज सेवा संघ चे अध्यक्ष आनंद जैन व सचिव ऋषिकेश कोंडेकर व त्यांच्या टीमने अतिशय दर्जेदार अशा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमासाठी जैन समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती येथील विजय चोरडिया यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे रक्तदान शिबिर व्याख्यानाचे आयोजन, विविध ग्रंथालय व गरीब होतकरू मुलांना पुस्तकांची भेट ,पेपर वाटणाऱ्या मुलांचा विमा, त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य पत्रकारांना वेगवेगळी मदत याबरोबरच वृक्ष लागवड चळवळ, कॉपीमुक्त अभियान व वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात त्यांच्या असणाऱ्या सहभागाबद्दल हा जैन समाज भूषण पुरस्कार त्यांना देण्यात आला. त्यावेळी जिंतूर येथील मंचकराव देशमुख सचिन रायपत्रीवार, संदीप माहूरकर, संतोष चौधरी, मनोज सारडा, सचिन देवकर, अशोक अच्छा, रणधीर शोभने, मनोज राजोरिया, यावेळी मित्रपरिवार उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.