शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा
सर्वच राजकीय पुढार्यांचे अभिवादन

जिंतूर—प्रतीवर्षा प्रमाणे याहीवर्षी जिंतूर शहरात बहुजन प्रतिपालक,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 395 व्या जयंती निमित्त संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनाचा वतीने सार्वजनिक शिवजयंती विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करुन जयंती हर्षोउल्हासात 19 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली..
बहुजन प्रतिपालक,कुळवाडी भूषण,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते याचेच औचित्य साधून संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना यांच्या वतीने सार्वजनिक शिवजन्मोत्सवा निमित्त शहरातील मुख्य मार्गावर भगवे पताका लावण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचा नियोजित जागेवर सकाळी 9 वाजता जिजाऊ ब्रिगेडचा वतीने शिवजन्माचा पाळणा,प्रतिमा पूजन करुण ध्वजारोहन करण्यात आले.यानंतर आन्नाभाऊ साठे चौकातुन तहसीलदार राजेश सरोदे,पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे,नगरपरिषदचे मुख्यालय सहाय्यक अजीज जनिमिया, नायब तहसीलदार प्रशांत राखे यांच्या हस्ते पूजन करुण भव्य दिव्य मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.
या मिरवणुकीत अश्वारूढ़ बाळशिवाजीराजे,माँ साहेब जिजाऊ,छत्रपती संभाजी महाराज यांचा वेषभुषेतील चिमुकले यांनी सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते.या मिरवणुकीत कस्तुरबा गांधी विद्यालय,जवाहर विद्यालयातील शाळेचा विद्यार्थी विद्यार्थिनीनी लेझीमचे विविध प्रकारचे सादरीकरण केले शिवाय ढोल पथकाने मिरवणुकीत शोभा वाढवली होती.
या मिरवणुकीत मोठ्या संखेने महिला,तरुणी भगवे फेटे बांधून सामिल झालेल्या असल्यामुळे वातावरण भगव्यमय झाले होते.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री 9 वाजता 395 तोफांची मानवंदना देण्यात आली.मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरुन निघुन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात समारोप करण्यात आला.
ही मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याचा दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मिरवणूक यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना व सार्वजनिक शिवजयंती मोहत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.
चौकट
राजकीय पुढाऱ्यांनी केले अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील राजकीय नेते पदाधिकारी यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन अभिवादन केले यामध्ये भाजपाचे तालुका अध्यक्ष गोविंद थिटे,माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख,सचिन गोरे,पिंटू चव्हाण,रमण तोष्णीवाल,माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे,पिंटू डोंबे,बालाजी पोरवाल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.