Uncategorized

पांगरी ग्रा.प.अंतर्गत पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभार्थी वंचित राहणार नाही सरपंच सौ मीनाताई केशवराव बुधवंत

पांगरी ग्रा.प.ला 64 घरकुलाची मंजुरी

जिंतूर— ग्रामपंचायत पांगरी अंतर्गत पांगरी येथील गरजू पात्र  घरकुल लाभार्थ्यांना वंचित ठेवले जाणार नाही. त्यांना त्यांचा घरकुलाचा लाभ देण्यात येईल असे स्पष्ट मत पांगरीच्या सरपंच सौ.मीनाताई केशवराव बुधवंत  यांनी स्पष्ट केले.
आज नुकतेच ग्रामपंचायत पांगरी येथे मंजूर झालेल्या प्रधानमंत्री घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे प्रमाणपत्र वाटण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने प्रधान मंत्री आवाज योजने अंतर्गत एकूण 64 घरकुलास मंजुरी आलेली असून या पैकी तब्बल 49 प्रधानमंत्री घरकुल आवास लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने लाभ देणे सुरू झालेले आहे.
पांगरी ग्रामपंचायतीला पहिल्या टप्प्यात 13 घरकुल व दुसऱ्या टप्पात 51 घरकुलाचा लॉट मंजूर झालेला असल्याची माहिती सरपंच सौ.मीनाताई बुधवंत यांनी स्पष्ट केले.
या वेळी सरपंच सौ.मीनाताई बुधवंत,केशवराव अर्जुनराव बुधवंत,उपसरपंच सिताराम चांदणे ग्रामपंचायत सदस्य नारायणराव डुकरे मुख्याध्यापक बोकन ग्रामपंचायत ऑपरेटर यशवंत घुगे,अशोकराव बुधवंत व घरकुल लाभार्थीची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button