Uncategorized
नामदार मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन
जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांची माहिती

जिंतूर—(गुणीरत्न वाकोडे) परभणी जिल्ह्यातील व नागरिकांच्या प्रलंबित विविध समस्याचे निकारण करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखालील नागरिकांचे मूलभूत प्रश्न प्राध्यान्याने सुटावे या हेतूने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हा जनता दरबार येत्या सोमवारी 24 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ठेवण्यात आलेला आहे.
या वेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर नागरिकांशी संवाद साधून विविध प्रश्नाचे निकारण करणार आहेत.तरी नागरिकांनी आपल्या प्रश्नासह उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी केले आहे.