Uncategorized

मयत दिपकच नाव अजरामर राहील-माधव दराडे

दिपकच्या महान अवयव दानाने आठ जिवाना जीवदान!!!

मयत दिपकच नाव अजरामर राहील-माधव दराडे
@ मयत दिपकच्या महान अवयव दानाने आठ जणांना जीवदान!!!
@ परभणीत दुसऱ्यांदा ग्रीन कॉरिडोर ; युवकाचे अवयव दान

जिंतूर: (गुणीरत्न वाकोडे)
तालुक्यातील चिंचोली दराडे गावातील २५ वर्षीय युवक दीपक विलासराव दराडे याचे पाच अवयव दान करण्यात आले. यासाठी रविवारी (ता. २३) रात्री परभणी शहरातील देवगिरी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला.

या बाबत माहिती अशी कि,
दराडे हा युवक शुक्रवारी मोटरसायकल अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यास कुटुंबातील सदस्यांनी परभणीतील देवगिरी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतू तेथील डॉक्टरांनी त्या युवकांस ब्रेन डेड घोषित केले. त्यातून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला, परंतु त्यातून सावरत कुटुंबियांनी अवयव दानाचा निर्णय घेतला,पाठोपाठ डॉ. एकनाथ गबाळे यांनी सहकारी डॉक्टरांची टीम तयार करून अवयव दानाची प्रक्रिया पूर्ण केली.
नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण केल्यानंतर आज रविवारी सायंकाळी ६ वाजता अवयव दाना संदर्भात प्रक्रिया सुरू केली. दराडे याचे हृदय मुंबईला पाठवण्यासाठी परभणी ते नांदेडदरम्यान ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला. नांदेडहून चार्टर प्लेनद्वारे हृदय मुंबईला पाठवण्यात आले. फुफ्फुसे (लँग्स) दुसऱ्या चार्टर प्लेनने पुण्याला, तर यकृत (लिव्हर) नागपूरला पाठविण्यात आले. दीपकच्या दोन्ही किडन्या छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आल्या. या महत्त्वपूर्ण अवयवदान प्रक्रियेमुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. दीपकच्या कुटुंबीयांच्या या निर्णयाचे समाजात सर्वत्र कौतुक होत आहे.

परभणीत दुसऱ्यांदा ग्रिन कॅरिडॉर
या पूर्वी ऑक्टोबर २०२४ मधे जिंतूर शहरातील सार्थक नवले या युवकाचे अवयव दान करण्यात आले होते. त्यानंतर हे दुसरे अववय दान झाले आहे.
———————————————
@ दिपकच नाव अजरामर राहील–माधव दराडे
———————————————
मरावे परी किर्ती रुपे उरावे,अमर दीपक… जीवनदानाची ज्योत!

काही माणसं जरी या जगातून निघून जात असली तरी, त्यांची माणुसकीची प्रकाशज्योत कायम तेजस्वी राहते!

दीपक दराडे यांनी या जगाचा निरोप घेतला, पण आपल्या आई-वडिलांच्या महान निर्णयामुळे ते आता अनेक जणांसाठी नवजीवनाचा दीप बनले आहेत. त्यांच्या 2 नेत्र, 2 किडनी, 1 लिव्हर, 2 फुफुसे आणि 1 हृदय गरजवंत रुग्णांना नवसंजीवनी देणार दराडे कुटुंबियांचा हा अतुलनीय त्याग, त्यांच्या विशाल मनाचा हा अनमोल ठेवा – खऱ्या अर्थाने मानवतेचा विजय आहे!
दिपक तु 8जणांना अवयव रुपी जिवदान दिले.
संपलाय फक्त प्रवास… दीपकचं नाव मात्र अजरामर झालंय अशी भावनिक प्रतिक्रिया भाजप युवा मोर्चाचे माधव दराडे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button