Uncategorized

माय छोटा इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस वितरण थाटात संपन्न

जिंतूर:- (गुणीरत्न वाकोडे)
माय छोटा इंग्लिश स्कूल येथे दिनांक 22 फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारोह संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्दुल माबुद कुरेशी सर तर प्रमुख पाहुणे म्हणून अखील भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शकील अहमद, गुणीरत्न वाकोडे, भागवत चव्हाण, माबुद खान यांची मंचावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात सुहाना मॅडम व सबा मॅडम यांच्या कुरआन पठणाने झाली. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. प्रस्तावना शाळेचे अध्यक्ष अजमत पठाण यांनी सादर करत माय छोटा स्कूल येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात 2025-2026 मध्ये गरीब व गरजू ई.डब्ल्यू. एस. व बीपीएल धारकांना आपल्या लेकरांना इंग्रजी माध्यमातून शिकविण्यासाठी फीस मध्ये सवलत देनार आहे अशी माहिती दिली. नंतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शकील अहमद व गुणीरत्न वाकोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात अब्दुल माबुद कुरेशी सर यांनी पालकांना विशेष मार्गदर्शन केले. शाळेत घेण्यात आलेले क्रीडा दिवस याचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले अब्दुल माबुद कुरेशी सर यांनी लेकरांचे कौशल्य पाहून आनंद व्यक्त करत बक्षीस दिले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी विविध तराने व गाण्यांवर आपले कलागुण सादर केले. या विद्यार्थ्यांना सबा मॅडम, सुहाना मॅडम, सफा मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
स्नेहसंमेलनात पालकांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहाना मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सबा मॅडम यांनी मानले. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button