कार्यसम्राट नामदार मेघना बोर्डीकरांचा भोगाव (देवी) येथे होणार भव्य नागरी सत्कार!!!
शनिवारी आयोजित सत्कार सोहळ्यात अन्य पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांचा होणार भाजपत प्रवेश

कार्यसम्राट नामदार मेघना बोर्डीकरांचा भोगाव देवी) येथे होणार भव्य नागरी सत्कार
जिंतूर—भोगाव (देवी) येथे उद्या शनिवार रोजी सायंकाळी ५.३० वाजता कार्यसम्राट नामदार आदरणीय मेघनादीदी साकोरे बोर्डीकर यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे.
या सत्कार समारंभ निमित्ताने इतर पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश देखील संपन्न होणार असून यावेळी मा.आ. रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार सोहळा होणार आहे.
या कार्यक्रमास सर्व भाजपा पदाधिकारी,शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, युवा वॉरियर्स, सुपर वॉरियर्स, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, शहरातील व गावातील सर्व भाजपा प्रमुख व्यक्तींनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा कार्यालया मार्फत करण्यात आले आहे.
सदरील आयोजित भव्य नागरी सत्कार व अन्य पक्षातून भाजप पक्ष प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम बाजार मैदान भोगाव (देवी) येथे आयोजित करण्यात आलेला आहे.असे आयोजकाच्या वतीने कळवण्यात आले आहे.