जिंतूर शहरात संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी.
चिमुकल्याच्या आकर्षक वेशभूषेने लक्ष वेधले

जिंतूर (गुणिरत्न वाकोडे)
जिंतूर राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती सोहळा शनिवार रोजी जिंतूर शहरात आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. अतिश बाजी ढोलताशा व आकर्षक मिरवणूक अधिक उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
संत सेवालाल महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शहरातील अर्बन कॉलनी ते हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या परिसरात पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
सकल बंजारा समाजाच्या वतीने संत सेवालाल महाराज यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.
आयोजकाच्या वतीने समाजातील प्रतिष्ठित नागरिकांचा येथे सन्मान करण्यात आला. संत सेवालाल महाराज यांच्या 286 व्या जयंतीनिमित्त शहरातील जय सेवालाल नगर येथील अर्बन कॉलनी येथे समस्त बंजारा समाजाच्या वतीने महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
तत्पूर्वी पारंपारिक वेशभूषेत महिला व पुरुष यांच्या वतीने फेटे बांधून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली ही अर्बन कॉलनी येथून मुख्य चौक स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळा येथे पारंपरिक पद्धतीने महिला व पुरुषांनी लेंगी नृत्य गायन केले.
यानंतर नियोजित अर्बन कॉलनी येथे येऊन बंजारा भजन प्रवचन झाले. संत श्री सेवालाल महाराज यांचा पाळणा गायन करण्यात आले. यावेळी उपस्थित हजारो नागरिकांना महाप्रसादाचेही आयोजकाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. पंचकोशातील हजारोंच्या संख्येने बंजारा समाज बांधव उपस्थित होता.