अमरगढच्या शिव महोत्सवात राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचा होणार नागरी सत्कार
भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे संस्थानाकडून आव्हान

जिंतूर : (गुणीरत्न वाकोडे)
तालुक्यातील येनोली येथील अमरगड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्र व राष्ट्रसंत ईश्वर सिंग महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रसंत ईश्वर सिंग महाराज व संत शिवचरण बापूजी यांच्या समाधीस्थळी अमरगड येथे दि. २६ फेब्रुवारी बुधवार रोजी बंजारा समाजाच्या वतीने राष्ट्रसंत ईश्वर सिंग महाराज यांची जयंती व महाशिवरात्र मोठ्या थाटात महोत्सव साजरा होणार आहे.
दरम्यान या महोत्सवात दि.२६ फेब्रुवारी बुधवार रोजी सायंकाळी ८: ०० महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांची महाराष्ट्राच्या राज्यमंत्रीपदी निवड झाल्याने भव्य नागरिक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
भव्य नागरी सत्कार सोहळा या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भारतीय जनता पार्टीचे नेते माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर हे उपस्थित राहणार आहे. दरम्यान यावेळी बंजारा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक मातोश्री लक्ष्मीबाई शिवचरण महाराज, महंत ज्ञानेश्वर माऊली महाराज व श्री संत ईश्वरसिंह महाराज ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आला आहे.